गायक शैलेंद्र सिंग

बॉबी मधील गाण्याने ज्या ‘मैं शायर तो नहीं मगर ऐ हसीं’ या गाण्याने जी धमाल उडवली. या गाण्याचे गायकानी हे गाणे आपल्या जीवनात पहिल्यांदा गायले होते व जो या फिल्मी सृष्टीत अभिनेता होण्याचे स्वप्न घेऊन आला होता. त्यांचे नाव शैलेंद्रसिंग.त्यांचा जन्म ४ ऑक्टोबर १९५२ रोजी झाला.

शैलेंद्र सिंग, यांचा जन्म मुंबईतलाच, कॉलेज झाल्यानंतर अभिनेता होण्याचे भूत त्यांच्या अंगात होते त्यामुळे त्यांनी पुण्याच्या FTTI मध्ये प्रवेश घेतला. राजकपूर ऋषी कपूर यांना घेऊन नवीन चित्रपट ‘बॉबी’ सुरु करणार होते. सर्व दिग्गज गायक किशोरकुमार, मो. रफी, मुकेश त्यावेळेस आपल्या चरमसीमेवर होते, पण राजकपूर ह्यांच्या मनात आणखी काही वेगळे होते. राजकपूर यांनी शैलेंद्र सिंग यांना लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या कडे पाठविले. ऑडिशन नंतर ठरल्या गेले कि बॉबी चे गाणे शैलेंद्रसिंगच गाणार आहेत. तेथूनच त्यांचे गायकीचे करियर सुरु झाले आणि अभिनय बाजूला पडले.

त्यांनतर शैलेंद्रसिंग यांनी ऋषीकपूर साठी खूप चित्रपटांसाठी आवाज दिला. त्यांना ऋषीकपूर चा आवाज मानल्या जाऊ लागले. पण पुढील कालावधीत स्पर्धात्मक वातावरणात ते टिकाव धरू शकले नाही आणि हळू हळू फिल्मी सृष्टी तून मागे पडले. पण चित्रपटांविषयी असलेले प्रेम आणि मराठी नसताना पण मराठी बद्दल असलेली आपुलकी त्यामुळे ते काही मराठी सिनेमाचे निर्माते होते. मराठीतून सुद्धा त्यांनी काही गाणी गायली आहे.

संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ.शशांक गिरडकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*